एक्सप्रेसवेवरील तिहेरी अपघातात सात जखमी

accident
पुणे – शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा घाटात तीन बसेस एकमेकांवर आदळून झालेल्या विचित्र अपघातात बसमधील सात प्रवासी जखमी झाले आहेत. या तीनही खाजगी बसेस मुंबईच्या दिशेने जात होत्या. या अपघातामुळे पुण्य़ाहून मुंबईच्या दिशेने येणा-या वाहतूकीचा मोठा खोळंबा झाल्यामुळे महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईकडे येणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे हायवेवर वळवण्यात आली आहे.

Leave a Comment