शेअर बाजारात पुन्हा आली तेजी

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मागच्या दोन सत्रात ४९३ अंकांची घसरण नोंदवीत आज सकाळी व्यवहाराला सुरुवात होताच १०२ अंकांची तेजी दिसून आली.

बीएसई सेन्सेक्सचा २७,३११ अंकांवर सध्या व्यवहार सुरु असून ऊर्जा, भांडवली वस्तू, पायाभूत सुविधा, बँकिंग आणि धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी आहे. बीएसई सेन्सेक्स सावरल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही ४४ अंकांची वाढ झाली असून, निफ्टी सध्या ८२१८ अंकांवर आहे.

शेअर बाजारात मागच्या दोन आठवडयांपासून सतत चढ-उतार सुरु आहेत. रिलायन्स कॅपिटलने प्रस्तावित बँकिंग आणि अन्य व्यवसायातील गुंतवणूकीसाठी जापानच्या सुमिटोमो मुतसूई ट्रस्ट बँकेबरोबर हातमिळवणी केल्याने रिलायन्स कॅपिटलच्या शेअर्समध्ये तेजी आहे.

Leave a Comment