स्मिथ आणि हॅडीनने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव

cricket
मेलबर्न : आजपासून सुरु झालेल्या मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ५ बाद २५९ धावांची मजल मारली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार स्टीव्हन स्मिथ ७२ धावांवर, तर ब्रॅड हॅडिन २३ धावांवर खेळत होता.

तत्पूर्वी आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाला डावाच्या सुरुवातीलाच झटका बसला. या मालिकेत खो-याने धावा काढणा-या डेव्हीड वॉनर्रच्या रुपाने भारताला पहिले यश झटपट मिळाले. उमेश यादवने वॉ़नर्रला भोपळाही फोडू न देता शिखर धवनकरवी झेलबाद केले. त्यानंतर रॉजर्स ५७ धावांवर असताना मोहम्मद शमीने त्याला झेलबाद केले.

वॉटसनला अश्विनने ५२ धावांवर पायचीत पकडले. धावफलकावर संघाच्या ११५ धावा असताना रॉजर्स आणि वॉटसन लागोपाठ बाद झाले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्मिथ आणि मार्शने डाव सावरला. मार्शला ३२ धावांवर शामीने बाद केले. बर्न्सला १३ धावांवर उमेश यादवने झेलबाद केले. उमेश यादव आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन तर, अश्विनने एकगडी बाद केला आहे.

Leave a Comment