प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबईला विज्ञान परिषदेच्या आयोजनाचा मान

mumbai-vidyapeeth
मुंबई – विज्ञान परिषद आय़ोजनाचा यंदाचा मान मुंबई विद्यापीठाला मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार असून उदघाटनावेळी माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दूल कलाम आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थींही उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेचे आयोजन मुंबईतील बांद्रा-कुर्ला संकुलाच्या जवळपास २० हजार चौरस फुटांच्या जागेवर ३ ते ७ जानेवारी दरम्यान करण्यात आळे आहे. मानवी विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग, अशी यंदाच्या परिषदेची थीम असून त्यासाठी देश-विदेशातल्या ८५० हून अधिक प्रोजेक्टसचा सहभाग असेल.

यासंदर्भात माहिती कुलगुरु वेळूकर आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे तब्बल ५४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुंबईला विज्ञान परिषदेच्या आयोजनाचा मान मिळाल्याने प्रशासनाने जोरदार तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.

Leave a Comment