शुल्क कारणावरून केली मित्राची हत्या!

murder
सातारा : अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राची मोबाईलमधला गेम डिलीट केल्याच्या शुल्क कारणावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातल्या पाटणमध्ये घडली असून विशाल भिसे हा पुसेगावच्या सेवागिरी यात्रेनिमित्त आपल्या आजोळी आला होता. विशालला मारणारा संबंधित अल्पवयीन मुलगाही रथाबरोबर पुसेगावला गेला होता.

मोबाईलमधले गेमचे अॅप्लिकेशन डिलीट केल्याने विशाल आणि संबंधित मुलामध्ये वाद झाला. त्यानंतर विशाल पाटणला परतल्यानंतर संबंधित मुलाशी विशालचा पुन्हा एकदा झाला आणि त्या अल्पवयीन मुलाने चाकूने विशालवर वार करून त्याची हत्या केली.

दरम्यान संशयित अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सातारा येथील बाल न्यायालयात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Comment