आला ६५ हजाराचा ‘गॅलेक्सी नोट एज’

note-edge
मुंबई – आज भारतात कोरियन कंपनी सॅमसंगने आपला नवा ‘गॅलॅक्सी नोट एज’ हा स्मार्टफोन लाँच केला असून हा स्मार्टफोन विक्रीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उपलब्ध होणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची किंमत ६४ हजार ९०० रुपये इतकी ठेवली आहे. महिन्याभरापूर्वीच सॅमसंगने २२ देशांमध्ये ‘गॅलॅक्सी नोट एज’ स्मार्टफोन लाँच करणार असल्याचे सांगितले होते.

‘गॅलॅक्सी नोट एज’ची वैशिष्ट्ये – ५.६ इंचाचा डिस्प्ले, ३२ जीबी मेमरी, २.७ गिगाहर्टझ स्नॅपड्रॅगन ८०५ प्रोसेसर, तीन जीबी रॅम, १६ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा, ३.७ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, अँड्रॉईड ४.४ किटकॅट, वायफाय, एनएफसी, ब्लूटूथ, फिंगर स्कॅनर, हार्ट रेट मॉनिटर, यूव्ही अशी आहेत.

Leave a Comment