
लाहोर – पाकच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजिण्यात येणार्या कार्यक्रमांमध्ये पुत्र बिलावल याला सहभागी करून घेण्यासाठी त्याची मनधरणी करायला पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे उपाध्यक्ष आसिफ अली झरदारी सध्या लंडनमध्ये दाखल झाले आहेत.
बिलावलला सहभागी करून घेण्यासाठी लंडनमध्ये झरदारी
पिता-पुत्रामध्ये गेल्या आठवड्यात पक्षाचा कारभार सांभाळण्यावरून मतभेद झाल्यानंतर बिलावल लंडनला निघून गेला होता. रावळपिंडी येथे एका सभेला संबोधित करून परतणार्या बेनझीर यांच्यावर २७ डिसेंबर २००७ रोजी झालेल्या हल्ल्यात त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर, दरवर्षी बेनझीर यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमांना बिलावल उपस्थित राहतो.
