राष्ट्रीय खेळ घोटाळा; कलमाडी, प्रसाद आणि पाठक यांची कसून चौकशी

kalmadi
रांची – भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रीडामंत्री सुरेश कलमाडी, संघटनेचे माजी तांत्रिक संचालक एएसव्ही प्रसाद आणि झारखंड ऑलिम्पिक संघाचे कोषाध्यक्ष मधुकांत पाठक यांची झारखंड येथे ३४ व्या राष्ट्रीय खेळांच्या आयोजनादरम्यान झालेल्या घोटाळ्याप्रकरणी देखरेख संस्थेकडून कसून चौकशी करण्यात आली आहे. या तिघांनाही चौकशीसाठी एएसपी आनंद जोसेफ तिग्गा यांनी पाचारण केले होते. तिघांचीही तब्बल साडेतीन तास चौकशी करण्यात आली.

या तिघांशिवाय झारखंड ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष आर. के. आनंद आणि ऑलिम्पिक संघाचे माजी महासचिव ललित भनोट यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र पत्नीच्या आजारपणामुळे आनंद आणि मुलीच्या लग्नानिमित्त भनोट उपस्थित राहू शकले नाहीत.

झारखंड येथील राष्ट्रीय खेळांमध्ये आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी कुठलीही यादी जाहीर करण्यात आली नसल्याची स्पष्टोक्ती सुरेश कलमाडी यांनी यावेळी दिली. देखरेख संस्थेला १७ एप्रिल २००८ रोजी एक लेखी पत्र प्राप्त झाले होते, ज्यात कुठल्या कंपनीकडून साहित्याची खरेदी केली जावी, याची यादी देण्यात आली होती. एएसव्ही प्रसाद यांच्या स्वाक्षरीने ही यादी जारी करण्यात आली होती.

Leave a Comment