पश्चिम रेल्वेचे तीन तेरा

mumbai-local
मुंबई – सकाळी साडेनऊच्या सुमारास पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील वाहतूकीचे ओव्हरहेड वायर तुटल्याने तीन तेरा वाजले आहेत. ऐन गर्दीच्या वेळेस लोकलचा खोळंबा झाल्याने कामावर जाणा-या प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. रेल्वे अधिकारी आणि कर्मचा-यांनी दुरुस्तीचे काम सुरु केल्याने बिघाड दूर करण्यास किती वेळ लागेल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Leave a Comment