
मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना मुंबईच्या वडाळ्यात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या घराशेजारी राहणारा नजीर मुल्ला आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तीनजण अटकेत
नजीर आणि त्याचे मित्र १९ तारखेला घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून घरामध्ये शिरले आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीवर सध्या सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून पीडित मुलीच्या नातेवाईकांना आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
आता अल्पवयीन मुलींनाही वाढत्या बलात्काराच्या घटनांमध्ये लक्ष्य केले जात असल्यामुळे अशा वासनांधांना वारंवार कडक शिक्षेची मागणी होते आहे. दरम्यान वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे पुन्हा एकदा मुंबईतील महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
