प्रख्यात लेखिका डॉ.माधवी सरदेसाई यांचे निधन

madhavi
मडगाव : आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कोकणीतील ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि यंदाच्या साहित्य अकादमीच्या पुरस्कार विजेत्या लेखिका डॉ.माधवी सरदेसाई यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्यावर मडगावमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. कोकणी भाषेवर मनापासून प्रेम करणाऱ्या माधवी ताईंच्या जाण्यानं साहित्य वर्तुळात शोककळा पसरली आहे.

गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी डॉ.माधवी सरदेसाई देसाई झुंज देत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचारही सुरु होते. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना गोव्यात आपल्या घरी आणण्यात आले होते. अशातच आज सकाळी चार वाजेच्या सुमारास माधवीताईं यांचे निधन झाले. माधवी सरदेसाई यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुली असा परिवार आहे.

सध्या अंतिम दर्शनासाठी मडगाव येथे त्यांचे पार्थिव बंधू आमदार विजय सरदेसाई यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला आहे.

Leave a Comment