शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी

eknath-shinde
नागपूर: नागपूरातील रवी भवन येथे असताना सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याची माहिती समोर आली असून या फोननंतर एकनाथ शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

नागपुरातल्या रवी भवनामध्ये शुक्रवारी शिंदे उपस्थित होते. त्यावेळी शिंदेंना सायंकाळी ५.५४ मिनीटांनी त्यांना फोन आला. शिंदे यांनी फोन उचलताच समोरच्या व्यक्तीने शिंदे यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिंदेंनी नागपूरचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांना फोनवरून सगळा प्रकार सांगितला. दरम्यान शिंदे यांच्या माहितीनंतर एकनाथ शिंदे यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

Leave a Comment