कामाच्या तासात मोबाईलचा कमीत कमी करा – राकेश मारिया

maria
मुंबई: मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पोलीस यंत्रणेची कार्यप्रणाली सुधारण्यासाठी, कामाच्या तासात मोबाईलचा कमीत कमी वापर करण्याचे आदेश दिले असून मारिया यांनी हे आदेश काही पोलीस अधिकारी कामाच्या वेळात फोनवर गप्पा मारताना आढळल्यामुळे दिले आहेत.

मोबाईल वर गप्पा मारताना कोणी पोलीस कामाच्या वेळांमध्ये आढळले, तर चौकशीनंतर कारवाईचे आदेश राकेश मारिया यांनी दिले आहेत. पण या आदेशामुळे पोलिसांची गैरसोय होण्याचीही शक्यता आहे. दोन पोलिस स्टेशन्समध्ये सतत संपर्क ठेवण्यासाठी बरेच पोलीस स्वत:चा मोबाईल वापरतात. मग अशा वेळी कारवाई कोणत्या निकषांवर होणार असा सवाल काही पोलिसांनी केला आहे.

Leave a Comment