‘इडी’कडून २० बड्या उद्योजकांवर गुन्हे दाखल

ed
नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने फेमा कायद्यांतर्गत देशातील २० बड्या उद्योगपतींविरोधात गुन्हा दाखल केला असून ‘इडी’ने हे गुन्हे परदेशातील एका आयलंडवर बेकायदेशीर पद्धतीने पैसे कमावणे तसेच कंपनी बनविणे व गुंतवणूक केल्याच्या आरोपाखाली दाखल केल्याचा खुलासा इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्वेस्टिगेटिव्ह जर्नलिस्टने केला होता. उत्पन्न विभागाने त्यानंतर त्यांची चौकशी केली होती.

ब्रिटीश वर्जिन आयलंडवर तथाकथित संपत्ती खरेदी करणे, कंपनी बनविणे आणि त्यावर पैसे गुंतवण्याचा आरोप या एस्सार ग्रुप-रविकांत रूईया, ओसवाल ग्रुप – अभय ओसवाल, डाबर ग्रुप – चेतन बर्मन, सत्यम ग्रुप- तेजा राजू, किंगफिशर – विजय मल्ल्या, प्रिमिअर अॅटोमोबाईल – मैत्रेय विनोद दोषी, ग्रीन प्लाय- सौरभ मित्तल, ओनिडा – सोनी सोनू मीरचंदानी, यूके पेटेंस – गुरूबचन धींगरा, डायमंड ट्रेडर्स, मुंबई – किर्तीलाल मेहता आणि भाविन मेहता, बडोद्याचे – समरजीत सिंह, चमांग टी एक्स्पोर्ट – यशोवर्धन लोहिया, समीर मोदी, मिनाक्षी जटिया, सुनीत खटाऊ कुटुंबातल्या तीन जणांवर करण्यात आला आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) पाठविलेल्या नोटीसमध्ये भारतीय कंपनी आणि विदेशी कंपन्यांच्या माहितीचा तपशिल मागवला आहे. याशिवाय परदेशात असलेली स्थिर व जंगम मालमत्ता आणि परदेश दौऱ्यांचा तपशिलही या उद्योजकांकडून मागवण्यात आला आहे. सर्व उद्योगपतींची प्राथमिक माहिती घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

Leave a Comment