यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार डॉ. नारळीकर यांना जाहीर

jayant-narlikar
मुंबई : यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर यांना जाहीर झाला असून जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार ‘चार नगरातील माझे विश्व’ या आत्मचरित्रासाठी प्रदान करण्यात येणार आहे.

विज्ञानाच्या क्षेत्रात जयंत नारळीकर यांनी केलेले काम मोठे तर आहेच, पण या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या साहित्य मुशाफिरीचाही गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर कोंकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कारसाठी माधवी सरदेसाई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून त्यांना ‘मंथन’ या लेखसंग्रहासाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

Leave a Comment