बाळासाहेबांच्या स्मारकासाठी चार जागांची निवड

balasaheb
मुंबई – दोन वर्षांनंतर दिवंगत हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे घोडे पुढे सरकले असून त्यासाठी राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीने दक्षिण मुंबईतील चार जागा निवडल्या आहेत. ठाकरे कुटुंबीयांच्या सहमतीनंतर त्यातील एका जागेची लवकरच निश्चिती केली जाणार आहे. स्मारकाच्या उभारणी विश्वस्त मंडळाकडून की सरकारतर्फे करायची याचा निर्णय बाकी आहे. मात्र, ठाकरे कुटुंबीयांच्या सूचना लक्षात घेतल्या जाणार आहेत. महापौर बंगला (दादर), पार्क क्लब (शिवाजी पार्क), वडाळा आणि बॉम्बे डाइंग (परळ) या जागा आता निवडण्यात आल्या असून यातील पहिल्या दोन जागा पालिकेच्या आहेत.

Leave a Comment