ऑस्ट्रेलियात आढळले आठ मुलांचे मृतदेह

murder
सिडनी – ऑस्ट्रेलियामधील कैर्न्सयेथील एका घरात आठ मुलांचे मृतदेह आढळले असून या सर्व मुलांची हत्या झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

पोलिसांकडे क्वीन्सलँडमधील घरात एक महिला गंभीर जखमी झाल्याची तक्रार आली. यावेळी पोलिस घटनास्थळी गेले असता तपासादरम्यान त्यांना घरात आठ मुलांचे मृतदेह आढळून आले. ही सर्व मुले १८ महिने ते १५ वर्षांदरम्यानच्या वयाची आहेत.

दरम्यान, जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Comment