तालीबानी तळावर पाक सेनेचे हवाई हल्ले – ५७ ठार

pak-sena
पेशावर – पेशावर येथील आर्मी स्कूलवर तालिबानी संघटनेने हल्ला करून शाळकरी मुलांसह १४१ जणांना ठार केल्याचा बदला पाकिस्तानी सेनेने तालीबानी प्रशिक्षण केंद्रे असलेल्या पेशावरजवळच्या खबर कबिलाई भागात हवाई हल्ले करून घेण्याची सुरवात केली आहे. या हल्ल्यात ५७ दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले जात आहे.

पाकिस्तानचे आर्मी प्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना देशातील तुरूंगात बंदी असलेल्या ३ हजाराहून अधिक दहशतवाद्यांना ४८ तासात फाशी दिली जावी अशी मागणी करताना तालिबान्यांविरोधातील युद्ध सुरू केल्याची घोषणा केली होती. खबर जवळील हवाई हल्ले हा त्याचा कारवाईचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. या भागात तालिबान्यांची आश्रय घेण्याची अनेक ठिकाणे आहेत. पेशावर शाळेवरील हल्याच्या कट याच भागात शिजल्याची खबर पाक सेनेला मिळाल्यानंतर हे हल्ले करण्यात आले. यावेळी २० हवाई हल्ले केले गेले असल्याचेही समजते.

आर्मी प्रमुख राहील यांनी आमच्या मुलांना तुम्ही ठार केलेत आणि त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत तुम्हाला मोजावी लागेल असा इशाराच तालिबानी संघटनांना दिला आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनीही तालिबान्यांचा पूर्ण बिमोड केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे यापूर्वीच जाहीर केले आहे.

Leave a Comment