दहा वाजून ५० मिनिटांनी शनिवारी शेवटची लोकल

mumbai-local
मुंबई – येत्या शनिवारी मध्य रेल्वेकडून डीसी ते एसी परिवर्तनाची चाचणी घेतली जाणार असल्यामुळे शनिवारी रात्री १०.५० नंतर सीएसटीवरून एकही लोकल सुटणार नाही. रात्री साडेदहा ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत ही चाचणी चालणार असल्यामुळे २० डिसेंबरच्या रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी शेवटची लोकल सुटल्यानंतर थेट बारानंतर कसारा व कर्जतसाठी डेमू गाडी सोडण्यात येईल. यामुळे अर्थातच प्रवाशांची प्रचंड गैरसोय होणार आहे. २० डिसेंबरच्या रात्री बेस्टने जादा बसेस सोडाव्यात अशी मागणी मध्य रेल्वेने बेस्टकडे केली आहे.

चाचणीच्या काळात सुटणा-या लांब पल्ल्याच्या गाडय़ा डिझेल इंजिन लावून ठाण्यापर्यंत नेण्यात येणार आहेत. ही परिवर्तन प्रणाली अमलात आल्यास मध्य रेल्वेची दरवर्षी १२४ कोटी रुपयांची बचत होऊ शकेल.

Leave a Comment