शिवसेना जिल्हाप्रमुखावर बलात्काराचा गुन्हा दाखल

vijay
मुंबई : एका २४ वर्षी तरूणीने सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावर बलात्कारा केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सीबीडी येथे राहणा-या पीडित तरूणीने विजय चौगुले यांनी पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा चौगुले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, याविषयावर कोणीतीही प्रतिक्रिया चौगुले यांनी दिलेली नाही. मात्र, आपल्या वकिलासोबत चर्चा केल्यानंतर या विषयावर बोलेन, असे चौगुले यांनी सांगितले. चौगुले हे गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख आहेत. त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवी मुंबई शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

Leave a Comment