भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस

cricket
दुबई- भारत ऑस्ट्रेलियाहून केवळ ०.२ गुणांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत मागे आहे. आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार दोन्ही संघांचे प्रत्येकी ११७ गुण झाले आहेत.

पुढील वर्षी होणा-या तिरंगी मालिकेत अव्वल स्थानाची दावेदारी सिद्ध करण्याची या दोन्ही संघांना संधी मिळणार आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिरंगी मालिका १८ जानेवारीपासून सुरु होत आहे.

क्रमवारीत १२२ गुणांसह दक्षिण आफ्रिका तिस-या स्थानावर आहे. तर त्यापाठोपाठ श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे.

फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा विराट कोहली दुस-या स्थानावर कायम आहे. तर आफ्रिकेचा एबी डेविलियर्स अव्वल स्थानावर आहे. पहिल्या दहामध्ये शिखर धवन आणि महेंद्रसिंह धोनी हे अनुक्रमे पाचव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. गोलंदाजांमध्ये भारताचा केवळ भुवनेश्वर कुमार पहिल्या दहामध्ये आहे. या यादीत कुमार आठव्या स्थानावर आहे.

Leave a Comment