
इस्लामाबाद : मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याने पेशावर हल्ला भारताने केला असल्याचा जावईशोध लावला असून याचबरोबर भारतावरही असाच हल्ला या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करू, अशी धमकी सईदने दिली आहे.
भारतानेच केला पेशावर हल्ला : हाफिज सईद
या हल्ल्याला भारताचे पंतप्रधान नरेंद मोदी जबाबदार असल्याचा आरोप करीत हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना फोन करून ते ‘मगरमच के आसू रो रह है’ असा कांगावाही त्याने केला आहे. या हल्ल्याची किंमत भारताला चुकवावी लागले, अशी दार्पोक्तीही सईदने केली आहे. पेशावरमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी आर्मी स्कुलमध्ये निष्पाप चिमुकल्यांचा महाभयंकर रक्तपात घडवून आणला होता.
