दुबई बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सायना

saina-nehwal
नवी दिल्लीः दुबई वर्ल्ड स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात सायना नेहवालने विजयी सुरुवात केली असून चीनच्या शिजियांन वैंग सोबत सायना नेहवालचा पहिला सामना झाला. या सामन्यात २१-१७, २१-१८ गुणांनी सायनाने विजय मिळविला. आता सायनाचा दुसरा फेरीत जगातील दुस-या क्रमांकाची कोरियन खेळाडू शुंग जी ह्यून हिच्यासोबत आज होणार आहे.

के.श्रीकांत याने देखील पुरूषांच्या गटात जपानच्या केटों मोमोटा याला पहिल्याच सामन्यात हरवले. पहिल्या गेम मध्ये १५-२१ ने श्रीकांत मागे होता मात्र, नंतरच्या दोन गेम मध्ये २१-१६, २१-१० ने बाजी मारत त्याने यश मिळवले.

Leave a Comment