विन्स्टन चर्चिलनी काढलेल्या पेटींगला १७ कोटींची किंमत

churchill
लंडन – बिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी बनविलेल्या गोल्डन फिश अॅट चार्टवेल नावाच्या पेटींगला लिलावात तब्बल १८ लाख पौंड म्हणजे १७ कोटी ७१ लाख रूपयांची बोली मिळाली आहे. सूदबी ऑक्शनतर्फे हा लिलाव भरविला गेला होता. १९३२ साली चर्चिल यांनी हे पेटींग बनविले होते.

या पेटींगमध्ये केंट तलावाच्या किनार्‍यावर असलेले चर्चिल यांचे चार्टवेल हे घर दिसते आहे. चर्चिल यांची कन्या मेरी सोअमस यांच्याकडे हे पेटींग होते. याच बरोबर त्यांच्याकडे चर्चिल यांनी बनविलेली अन्य १५ पेटींग्जही होती. तीही या लिलावात मांडली गेली होती. मेरी यांचे मे महिन्यात वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे.

यापूर्वीही चर्चिल यांच्या एका पेंटिगला १० लाख पौंडाची बोली मिळाली होती व त्यावेळी ते रेकॉर्ड ठरले होते. गोल्डन फिश हे त्या दशकातले सर्वोत्तम पेंटींग होते असे लिलावकर्त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment