ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या दिवसअखेरीस ४ बाद २२१ धावा

shaun-marsh
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन कसोटीत भारताच्या सर्व बाद ४०८ धावांना दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद २२१ असे प्रत्युत्तर दिले असून स्मिथ ६५ तर मिचेल मार्श ७ धावांवर दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा खेळत होते.

सलामीवीर ख्रिस रॉजर्स आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतके झळकावली. रॉजर्स ५५ धावांवर बाद झाला. तर वॉटसन २५ आणि शॉन मार्श ३२ धावांवर बाद झाले. भारताकडून उमेश यादवने कांगारुंच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले तर अश्विनला एक गडी बाद केला.

तत्पूर्वी भारताचा पहिला डाव आदल्या दिवशीच्या ४ बाद ३११ धावांवरुन सर्व बाद ४०८ असा पहिल्याच आटोपला. या सत्रात भारताने केवळ ९७ धावा जमवून ६ गडी गमावले.

Leave a Comment