तेजीत आला मुंबई शेअर बाजार

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजाराने सलग पाच दिवसाच्या घसरगुंडी नंतर आज सकाळच्या सत्रातील व्यवहारात चांगलीच उसळी घेतली. ३९५ अंकांची मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात वाढ होऊन बीएसई सेन्सेक्स २७ हजारांच्या पुढे गेला आहे.

१२१ अंकांची राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही वाढ झाली असून, निफ्टीने पुन्हा ८१०० चा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७१.३१ अंकांच्या घसरणीसह २६७१० वर तर, निफ्टी ८०२९ वर बंद झाला होता. मागच्या पाच सत्रात सेन्सेक्समध्ये १,१२०.९७ अंकांची घसरण झाली आहे.

Leave a Comment