आरिफच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

aarif
मुंबई: कल्याण येथील इसिस या दहशतवादी संघटनेत सक्रिय झालेला आरिफ माजिदची चौकशी संपली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करावी, अशी मागणी करणारा अर्ज राष्ट्रीय तपास यंत्रणेने विशेष न्यायालयात केला व तो अर्ज ग्राह्य धरत न्यायालयाने आरिफला ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

२२ डिसेंबरला आरिफच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असून त्याआधीच एनआयएने त्याला विशेष न्यायाधीश यतीन डी. शिंदे यांच्यासमोर हजर करून त्याची चौकशी संपली असल्याचे जाहीर केले. त्यावेळी त्याच्या वकिलाने ही अर्ज करून आरिफच्या नातेवाईकांना कारागृहात भेटू देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली. तसेच आरिफला काहीही कबूल करायचे नसून तो निर्दोष आहे, असा दावाही त्याच्या वकिलाने केला या अर्जाची न्यायालयाने नोंद करून घेतली.

Leave a Comment