महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांची घोषणा

maharshtra
पुणे – अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने साहित्य आणि समाजकार्यासाठी देण्यात येणा-या पुरस्कारांची घोषणा झाली असून ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांना साहित्यामधील जीवनगौरव पुरस्कार तर सामाजिक कार्यातील जीवनगौरव पुरस्कार पुष्पा भावे यांना देण्यात येणार आहे. दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

अन्य पुरस्कारांमध्ये किरण गुरव यांना ललिक ग्रंथ पुरस्कार तर हिमांशू स्मार्त यांना रा.शं.दातार नाट्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढील वर्षी दहा जानेवारी रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे होणा-या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या प्रत्येकी पाच व्यक्तींना दर वर्षी हे पुरस्कार दिले जातात. गेल्या वर्षीपासून डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार दिला जात आहे.

Leave a Comment