एमडी ड्रगचा मुंबईतील कॉलेज तरुणांमध्ये वाढता वापर

drug
मुंबई – मेफेड्रोन अर्थात एमडी ड्रगने सध्या मुंबईत थैमान घातले असून, कॉलेज तरुणांपासून शाळकरी विद्यार्थीही या एमडीच्या फेर्‍यात अडकले आहेत. एकीकडे कोकेनसारखे ’उंची’ ड्रग किमान तीन हजार रुपये प्रति ग्रॅम मिळत असताना एमडी अवघ्या ७० रुपयांपासून मिळत असल्याने पॉकेटमनीतील पैशांतून हे ड्रग विकत घेता येत असल्याने त्याचा प्रसार वणव्यासारखा झाला आहे. हेच लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने ’ड्रग फ्री कॅम्पस’ ही मोहीम राबवण्यासही सुरू केली आहे. इतर प्रचलित ड्रग्जचीच किक अत्यंत कमी किंमतीत, मिळत असल्याने या ड्रगची तस्करी वाढतच असून, पोलिस आणि तरुण पिढीसमोरचे ते एक आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे ड्रग घेतल्याने कमालीचा उत्साह आल्याचे वाटत असले, तरी त्याचे दुष्परिणाम फारच घातक आहेत. एकीकडे मुंबई पोलिस ड्रग्जचा त्रास कमी करण्यासाठी झगडत असताना शहरातील पालकांनीही तितकेच सतर्क व्हावे अशी अपेक्षा पोलिस व्यक्त करतात.

Leave a Comment