आज मुख्यमंत्र्यांसमोर केंद्रीय पथकाचा अहवाल

devdendra
मुंबई : विदर्भ-मराठवाडय़ाच्या दौऱयावर राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंदीय पथकाकडून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री आणि केंदीय पथकाची बैठक अधिवेशनापूर्वी होणार असून या वेळी दुष्काळ पाहणी दौऱयाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात येईल. तसेच दुष्काळची सध्यस्थिती आणि शेतकऱयांच्या समस्या यावर बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

केंद्रीय पथकाच्या दुष्काळ पाहणी दौऱयात भेदभाव करण्यात येत असून, पथकातील अधिकारी घाईघाईने दौरा उरकता घेत असल्याची टीका शेतकऱयांसह विरोधकांकडून करण्यात आली होती. त्यामुळे हा दौरा वादाच्या भोवऱयात सापडला असताना मुख्यमंत्र्यांनी पथकाची पाठराखण केली होती. यापार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांसमोर सादर होणार आहे.

Leave a Comment