चार वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

school
मुंबई – मुंबईतील एका शाळेत ४ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून भांडूपच्या एका इंग्रजी माध्यमच्या शाळेत हा प्रकार घडला आहे.

या नराधमाने पीड़ित मुलीला गोड बोलून स्वच्छतागृहात नेले आणि तिथेच तिच्यावर बलात्कार केला. शाळेच्याच या कर्मचा-याने बलात्कार केल्याचे समोर आल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला आणि संतप्त जमावाने शाळेच्या परिसरात तोडफोड केली.

आरोपी हा शाळेचाच कर्मचारी आहे. मुलीने दिलेल्या माहितीवरुन भांडूप पोलिसांनी शाळेच्या सर्व कर्मचा-यांची चौकशी केली. त्यानंतर एका कर्मचा-याला अटक केली.

Leave a Comment