स्पाइसजेटचे आज एकही उड्डाण नाही

spicejet
मुंबई – तेल कंपन्यांनी क्रेडीटवर इंधन पुरविण्यास स्पाईस जेटला नकार दिल्यामुळे या कंपनीच्या एकही विमानाचे आज बुधवारी उड्‌डाण होऊ शकले नाही. आर्थिक अडचणीत असलेल्या स्पाईस जेटने दोन हजार कोटी रूपयांची देणी थकवली आहे.

आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या स्पाईस जेटवरील आज कोणत्याही विमानाचे उड्‌डाण न झाल्याने संकटात आणखी वाढ झाली आहे. स्पाईस जेटला दोन आठवडयांच्या उधारीवर पुन्हा इंधन पुरवठा सुरू करण्यासंबंधी सरकारी तेल कंपन्यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तेल कंपन्यांनी स्पाईसजेटकडून आधीची थकबाकी रक्कम देण्याची मागणी केल्यामुळे इंधनाचा पुरवठा थांबविला आहे.

स्पाईस जेटला बंद होण्यापासून वाचविण्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय प्रयत्न करत आहे. पण, तेल कंपन्यांनीच इंधन देण्यास नकार दिल्याने संकट आता आणखी वाढले आहे. कलानिधि मारन यांच्या मालकीच्या असलेल्या स्पाईसजेटला इंधनाअभावी २००० उड्‌डाणे रद्द करावी लागली आहेत. हवाई वाहतूक मंत्रालय , सरकारी तेल कंपन्या आणि विमानतळाचे संचालन करणार्‍या स्पाईस जेटला देणी चुकविण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्याची विनंती करणार आहे.

Leave a Comment