बॉक्सर सरिता देवीवर अखेर बंदी

sarita-devi
नवी दिल्ली: इन्चिऑन एशियाडमधील शिस्तभंगामुळे भारताची जिगरबाज बॉक्सर सरिता देवीवर एक वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशन घेतला आहे.

या प्रकरणात भारतीय संघाचे प्रशिक्षक जी. एस. संधू यांच्यावर कोणतीही कारवाई कऱण्यात आली नसून, परदेशी प्रशिक्षक बी.आय. फर्नाडेझ यांच्यावर मात्र दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

सरिता देवी ६० किलो वजनी गटात इन्चिऑन एशियाडमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. पण उपांत्य लढतीवर सरिता देवीने निर्विवाद वर्चस्व गाजवूनही, पंचांनी तिची प्रतिस्पर्धी जिना पार्कच्या बाजूने निकाल दिल्यामुळे नाराज झालेल्या सरिताने ऐनवेळी पोडियमवर कांस्यपदक स्वीकारण्यास नकार देऊन निषेध व्यक्त केला होता.

Leave a Comment