१५ दिवसांत बदलणार नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर – ऊर्जामंत्री

transformer
नागपूर – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत एप्रिल ते ५ डिसेंबर २०१४ या कालावधीत ३५०१ इतके ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले होते. त्यातील ३२८४ ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले असून, २१७ ट्रान्सफॉर्मर १५ दिवसांत बदलले जातील, असे आश्वासन दिले.

त्याचबरोबर बावनकुळे यांनी ६३ केव्ही क्षमतेचे शेतीपंपावरचे ट्रान्सफॉर्मर टप्प्या टप्प्याने बदलून १०० केव्ही क्षमतेचे करणार असल्याचे यावेळी सांगितले. अनधिकृत विजेचा वापर वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर नादुरूस्त होण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की ते दुरुस्त होणाऱया ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्त होते. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलण्याच्या दृष्टीने त्या भागात नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणे, तसेच कंत्राटदारांकडून तातडीने ते दुरुस्त करण्याचे निर्देश दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती करणाऱया ठेकेदारांबद्दल तक्रार असल्यास ते बदलून देण्यात येतील आणि तीनवेळा कोणतेही ट्रान्सफॉर्मर दुरूस्त केल्यानंतर तेथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येईल असे त्यांनी सांगितले. याबाबतचा मूळ तारांकित प्रश्न किशोर पाटील, हरिभाऊ जावळे आणि विजय वडेट्टीवार यांनी विचारला होता.

Leave a Comment