दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात हेझलवूड, स्टार्कचा समावेश

cricket
ब्रिस्बेन – भारताविरुद्धच्या ब्रिस्बेन येथे होणा-या दुस-या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघात दोन बदल करत जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या यंग ब्रिगेडचा संघात समावेश केला आहे.

मंगळवारी दुस-या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा करण्यात असून यामध्ये हेझलवूड आणि स्टार्कची निवड रॅयन हॅरिस आणि पीटर सिडले हे दोघेही दुखापतग्रस्त असल्याने त्यांच्या जागी कऱण्यात आली आहे.

शॉन मार्शची निवड दुखापतीमुळे मालिकेबाहेर असलेल्या क्लार्कच्या जागी करण्यात आली आहे. शॉन मार्श पाचव्या स्थानावर फलंदाजी करेल. यासोबतच या सामन्यात शॉनला आपला भाऊ मिशेल सोबत खेळण्याची संधी मिळत आहे.

ऑस्ट्रेलिया संघ – डेविड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, मिशेल मार्श, ब्रॅड हॅडिन, मिशेल जॉन्सन, मिशेल स्टार्क, नॅथन लॉयन, जोश हेझलवूड

Leave a Comment