सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सुरक्षा प्रमुख जाणार ऑस्ट्रेलियाला

bcci
मुंबई – भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा व्यवस्था सिडनीमधील ओलीस नाटयाच्या घटनेनंतर वाढवण्यात आली असली तरी, बीसीसीआयने भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षासंबंधी प्रमुख रवी सावानी यांना टीम इंडियाच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघ चार कसोटी सामने आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौ-यावर असून, ही मालिका संपल्यानंतरही आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियातच रहाणार आहे. ऑस्ट्रेलियन दूतावास सावानी यांनी व्हिसा द्यायला तयार झाला असून, सावानी मंगळवारी रात्री ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत.

Leave a Comment