सलग चौथ्यादिवशी सेन्सेक्सची गटांगळी

share-market
मुंबई – मुंबई शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी डॉलरसमोर रुपयाचे अवमूल्यन यामुळे घसरण सुरु आहे.

मंगळवारी सकाळी मुंबई शेअर बाजार उघडताच २७३ अंकांची घसरण झाली. सकाळी बीएसई सेन्सेक्स २७,०४६ अंकांवर होता मागच्या तीन सत्रात बीएसई सेन्सेक्समध्ये ५११ अंकांची घसरण झाली आहे.

राष्ट्रीय शेअर बाजारावरही या घसरणीचा परिणाम होत असून, ६४ अंकांची निफ्टीमध्ये घसरण झाली. निफ्टी ८१५५ अंकांवर होता. सोमवारीही सुरुवातीला शेअर बाजाराने गटांगळी घेतली होती. मात्र घाऊक महागाई दर नोव्हेंबरमध्ये शून्यावर आल्याने व्याजदर कपात होईल या अपेक्षेने गुंतवणूकदारांनी पुन्हा खरेदी करत ही घट ३१ अंकांवर मर्यादीत केली.

Leave a Comment