गुप्तहेर टूना रोबो मासा

tuna
लंडन – यूएस मिलीटरी ने स्पाईंग फिश म्हणजे गुप्तहेर मासा तयार केला असून हा रोबो मासा आहे. टूना रोबो असे त्याचे नामकरण केले गेले आहे. शत्रूच्या प्रदेशात हेरगिरी करण्याबरोबरच हा रोबो मासा आपल्या प्रदेशात पाण्यामार्गे येणार्‍या शत्रूवर कडक नजर ठेवणार आहे. त्याचबरोबर जहाजांची तपासणी करणे, पाणसुरूंग शोधणे या जबाबदार्‍याही तो पार पाडणार आहे.

या प्रकल्पाचे नाव सायलेंट नेमो असे असून हा मासा १०० पौंड वजनाचा व पाच फूट लांबीचा आहे.तो निळे पंख असलेल्या ट्यूना माशाप्रमाणे दिसतो. याचे नियंत्रण रिमोटने करता येतेच पण त्याच्या प्रोग्राममध्ये आपण त्याने कोणत्या मार्गावर गस्त घालायची आहे तो मार्ग ठरवून दिला तरी तो त्याच मार्गाने गस्त घालू शकतो. युनायटेड स्टेट ऑफिस ऑफ नेव्हल रिसर्चने त्याच्या चाचण्या केल्या असून त्यात त्याची क्षमता आणि ताकद अजमावली गेली आहे.

Leave a Comment