
लंडन – रविवारी संध्याकाळी लंडनमध्ये पार पडलेल्या मिस वर्ल्ड २०१४ या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या रोलिन स्ट्रॉस या सौदर्यवतीने यंदाच्या मिस वर्ल्ड २०१४च्या खिताबवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत रोलिनची या खिताबासाठी निवड जगभरातल्या १२४ सौदर्यवतींमधून झाली.
रोलिन स्ट्रॉस ठरली यंदाची ‘मिस वर्ल्ड’
हंगेरीच्या एडिना कलजारला दुसरे तर, अमेरिकेच्या एलिजाबेथ सॅफरीटला तिसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व कोयल राणाने केले. कोयल अंतिम पाचमध्ये स्थान मिळवू शकली नाही मात्र अंतिम अकरामध्ये तिने प्रवेश केला होता.
मागच्यावर्षीची विजेती मेगन यंगने मिस वर्ल्डचा झळाळता मुकूट रोलिनच्या डोक्यावर चढवला. रोलिनचे वय अवघे २२ वर्षांचे आहे. मिस वर्ल्ड स्पर्धेच्या इतिहासात तिस-यांदा या पुरस्कारासाठी दक्षिण आफ्रिकन सौदर्यवतीची निवड झाली.
