कुख्यात दरोडेखोर श्याम आठवले पोलिस चकमकीत ठार

encounter
बीड – दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आणि चोरी, खंडणी, लूटमारीच्या ५० गुन्ह्यांत आरोपी असणारा श्याम भीमराव आठवले पोलिसांसोबतच्या चकमकीत गेवराई तालुक्यात धोंडराईजवळ ठार झाला. पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली.

दुपारी २ वाजता श्याम आठवले (४०, सुभाष रोड, बीड) धोंडराईला गेला होता. कारने (एमएच १४ बीसी २९२३) तीन साथीदारांसह तो पुढे शेवगावमार्गे शिर्डीला निघाला. मात्र, कार अचानक बंद पडल्याने तो उतरला. तीन साथीदार कारमध्येच होते. मागावरील गुन्हे शाखेचे पथक पोहोचले. श्यामने पोलिस वाहनावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात सहायक निरीक्षक राहुल देशपांडे यांनी तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी श्यामच्या छातीत घुसली. घाटी रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Leave a Comment