आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सने केली निराशा

share-market
मुंबई – शेअर बाजारात ऑक्टोंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात झालेल्या घसरणीची नकारात्मक प्रतिक्रिया उमटली असून आज सकाळी बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २४५ अंकांनी घसरला.

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८२०० च्या खाली आला आहे. गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या विक्रीवर भर दिला आहे. सलग तिस-या सत्रात बाजारात घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २७,१०५ अंकांवर होता. आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम, भांडवली वस्तू, धातू, तेल आणि नैसर्गिक वायूंच्या शेअर्समध्ये घसरण सुरु आहे.

वाहन आणि ऊर्जा क्षेत्राच्या शेअर्सवरही विक्रीचा दबाव आहे. मागच्या दोन सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ४८० अंकांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ७१ अंकांची घसरण झाली असून, निफ्टी ८१५२ अंकांवर होता.

Leave a Comment