भय्यूजी महाराजांच्या गाडीला अपघात

bhayyuji-maharaj
उस्मानाबाद : काल रात्री साडे नऊच्या सुमारास इंदौर येथील दत्त महाराज संस्थानचे प्रमुख भय्युजी महाराज यांच्या गाडीला अंबाजोगाई उस्मानाबाद रस्त्यावर युसुफ वडगाव येथे अपघात झाला असून या अपघातात ते बचावले आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

भय्युजी महाराज काल मेहुण्याच्या लग्नासाठी व अन्य काही कार्यक्रमानिमित्त मराठवाडयात आले होते. अंबाजोगाई येथून उस्मानाबादला जात असताना युसुफ वडगाव येथे समोरून येणा-या मोटारीची भय्युजी महाराजांच्या मोटारीला धडक बसली. त्यात भय्युजी महाराज यांच्यासह अन्य एक जण किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर उम्मानाबाद येथे प्रथमोपचार करण्यात आले. सध्या त्यांची चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Comment