कॅलिफोर्नियात पावसाचा हैदोस- हजारो घरे अंधारात

california
अमेरिकेतील समृद्ध राज्य अशी ओळख असलेल्या कॅलिर्फोनियात वादळ आणि वादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असल्याचे वृत्त आहे. प्रथम वादळ आणि नंतर पावसाच्या थैमानामुळे अनेक झाडे आणि विजेचे खांब पडल्याने हजारो घरातील वीज गायब होऊन अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की कांही तासात रस्तांवर सहा ते सात फूट पाणी साठून पूरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती राज्याच्या अनेक भागात असून तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी त्यासाठी नावांचा वापर सुरू केला असल्याचेही दिसून येत आहे. दीर्घ काळ या राज्याला दुष्काळाच्या झळा बसत होत्या. आता आलेल्या पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. रस्त्यात अनेक वाहने पाण्यात बुडाली असून कांही घरांमध्येही पाणी शिरले आहे.

Leave a Comment