गुगल नेक्सस ५ बंद होणार?

nexus5
गुगलचे एक उत्तम डिव्हाईस म्हणून ओळख असलेले नेक्सस पाच चे उत्पादन बंद करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. गुगलने या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही व नेक्सस पाच ची विक्री २०१५ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार नेक्सस पाच साठी हार्डवेअर पार्टनर असलेल्या एलजीने या फोनचे उत्पादन बंद केले आहे. परिणामी स्टॉक असेपर्यंतच नेक्सस पाचची विक्री केली जाईल.

भारतीय स्टो्अर्समध्ये बराच काळ नेक्सस पाच उपलब्ध नाही. या डिव्हाईसची लाल व पांढर्‍या रंगाची उपकरणेही सध्या उपलब्ध नाहीत. तर केवळ काळ्या रंगातील उपकरणे बाजारात आहेत. या उपकरणाच्या अनुपलब्धतेमागे गुगलने नेक्सस ६ वर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले जांत असले तरी नेक्सस पाच चे उत्पादन बंद झाले आहे हे खरे कारण असल्याचे समजते.

Leave a Comment