युट्युबची बफरमुक्त ऑफलाइन व्हीडिओची सेवा

you-tube
मुंबई – युट्युबने भारतात मोबाईलवर वाढता वापर लक्षात घेऊन बफरमुक्त ऑफलाइन व्हीडिओची सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली. युट्युब अॅवपच्या या नव्या ऑफलाइन फीचरमुळे युझर्सना वाय-फाय किंवा डेटा प्लॅनचा वापर करून ऑफलाईन व्हीडिओज घेता येतील.

४८ तासांपर्यंत इंटरनेट कनेक्शनशिवाय हे व्हीडिओ घेतल्यानंतर ते पाहता येणे शक्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या सेवेमुळे बफरिंगचा मनस्ताप टळणार असून व्हीडिओ फ्रेमच्या आत असलेल्या ऑफलाईन आयकॉनवर टॅप करून युझर्स हे व्हीडिओ अॅळड करू शकतील.

युट्युबने अँड्रॉइड आणि आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी ऑफलाईन फीचरची घोषणा ‘अँड्रॉइड वन’ स्मार्टफोनच्या लाँचिंगच्या वेळी केली होती. भारतामध्ये इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ८५ टक्के लोक हे मोबाईलद्वारे इंटरनेटशी जोडले गेलेले आहेत. या देशातील आमच्याकडे येणारा ४० टक्के डेटा हा मोबाईलवरून येत असल्यामुळे नव्या फीचरसह डेटा कनेक्शन, वेग आणि खर्च अशा आव्हानांवर मात करणे शक्य असल्याचे युट्युबच्या इंजिनीअरिंग विभागाचे उपाध्यक्ष जॉन हार्डिग म्हणाले.

Leave a Comment