उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्र

combo
मुंबई – ‘दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्युपत्र तयार करताना त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणीही नातेवाईक किंवा कायदेशीर वारस उपस्थित नव्हते,’ अशी साक्ष हे मृत्युपत्र तयार करणार्या् वकिलांनी उच्च न्यायालयासमोर दिली. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रात थोरला मुलगा जयदेव यांचा उल्लेखही नाही. त्यामुळे या मृत्युपत्राला आक्षेप घेणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी सादर केली आहे. मृत्युपत्र तयार करताना उपस्थित असलेले ऍड. एफ. डिसुझा यांची जयदेव यांच्या वकील सीमा सरनाईक यांनी न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमक्ष उलटतपासणी घेतली. ‘मृत्युपत्र तयार करताना उद्धव ठाकरे, अनिल परब, शशी प्रभू, ज्येष्ठ विधिज्ञ तथा माजी खासदार अधिक शिरोडकर व बाळासाहेबांचे स्वीय सहायक रवींद्र म्हात्रे एवढेच लोक उपस्थित होते,’ अशी माहिती डिसुझा यांनी दिली.

Leave a Comment