चँपियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारत

hockey
भुवनेश्वर – भारताने गुरुवारी बेल्जियमचा हॉकी चँपियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत ४-२ पराभव करत उपांत्य फेरी गाठली. रुपिंदर (पेनल्टी कॉर्नरवर), एस. के. उथप्पा, अक्षरदीप आणि धरमवीर यांचा प्रत्येक एक गोल भारताच्या विजयात मोलाचा ठरला. ०-२ पिछाडीतून भारताने हा विजय खेचून आणला. ०-२ पिछाडीनंतर अप्रतिम काउंटर अॅ टॅक आणि वेगवान हॉकी ही भारताच्या विजयात मोलाची ठरली. याबरोबरच भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यामधील लढत शनिवारी म्हणजेच उद्या बघायला मिळणार आहे. पाकिस्ताननेही अन्य उपांत्यपूर्व लढतीत हॉलंडचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Leave a Comment