मराठी भाषेची सक्ती ही टोकाची भूमिका : डॉ. सदानंद मोरे

sadanand-more
पुणे – संत नामदेवांची कर्मभूमी घुमानला होणा-या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची बुधवारी निवड झाली. यावेळी बोलताना त्यांनी मराठी भाषेची, मराठी शाळांची सक्ती करावी, ही अत्यंत टोकाची भूमिका झाली. कुठल्याही बाबतीत अतिरेकी टोकाची भूमिका घेऊ नये, असे माझे मत आहे. आजच्या काळात तर उपरोक्त कुठलीही भूमिका सर्वस्वी स्वीकारणे अशक्य आहे, त्यामुळे समन्वयाची बाजू मांडणे महत्त्वाचे आहे. घुमानचे साहित्य संमेलन ही समन्वयवादी भूमिका मांडण्याचे सर्वमान्य व व्यापक व्यासपीठ आहे, असे विचार मांडले.

Leave a Comment