
तैवानची कंपनी एसरने स्नॅपडील या ऑनलाईन कंपनीशी पार्टनरशीप करार करून त्यांचे दोन नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत. या निमित्ताने एसरने पुन्हा एकदा भारतीय बाजारात पाऊल घातले असल्याचे समजले जात आहे. एसर लिक्वीड ई७०० आणि एसर लिक्वीड झेड हे दोन स्मार्टफोन स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून त्यांच्या किमती अनुक्रमे ११९९९ व १६९९९ अशा आहेत.
एसरने आणले दोन नवे स्मार्टफोन
एसर लिक्वीड झेड साठी ७.१५ इंची स्क्रीन, गोरिल्ला ग्लास संरक्षणासह दिला गेला आहे. १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, १३ एमपीचा रियर व २ एमपीचा फ्रंट कॅमेरा तसेच थ्रीजी, ब्ल्यू टूथ, वायफाय, जीपीएस कनेक्टीव्हीटी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. एसर लिक्वीड इ ७०० साठी पाच इंची स्क्रीन व १६ जीबीची इंटरनल मेमरी दिली गेली आहे.
