लाचलुचपतीत महसूल विभागाची आघाडी

corruption
पुणे – भ्रष्टाचार आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ७ डिसेंबर या काळात केलेल्या कारवायांनुसार या काळात पुण्यात महसूल विभाग लाचलुचपत आणि भ्रष्टाचारात पहिल्या नंबरवर आला आहे तर दुसरा क्रमांक पोलिस विभागाचा आहे. या काळात या विभागाने विविध ठिकाणी सापळे रचून ११६२ जणांवर कारवाई केली आंहे. त्यात महसूल विभागात लाचलुचपत प्रकरणात ३०५, बेहिशोबी संपत्तीबाबत ४७ तर भ्रष्टाचाराबाबत २३ कारवाया केल्या गेल्या आहेत. एकूण कारवायांत २ कोटी ४२ लाख रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यातील महसूल विभागाचा वाटा ३०,२९,७०० रूपये इतका आहे.

राज्यात पुणे विभागात लाचलुचपत, भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली आहेत. पुणे विभागात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागात २११ ठिकाणी कारवाया केल्या गेल्या तर मुंबईत हेच प्रमाण ८९ इतके आहे. अन्य खात्यांत आरोग्य ४२, वनविभाग १६, कृषी १५, शिक्षण ५२ अशी या प्रकरणांची संख्या आहे. ग्रामविकास, सिडको, धर्मादाय आयुक्त कार्यालय, प्रदूषण नियंत्रण विभाग, बेस्ट, वक्फ बोर्ड या विभागातही लाचलुचपत आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गवर्षीच्या तुलनेत यंदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुप्पट कारवाया केल्या आहेत.

Leave a Comment